लख लख तेजाची चांदोरी!
हिंगणे घराण्याचा पराक्रम, अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली मंदिरे, इंद्राचे दुर्मिळ मंदिर, सध्या आठवणींमध्ये हरविलेले जुने वाडे, नारायण महाराजांची संजीवनी समाधी, लोककलावंत माधवराव गायकवाडांची तपस्या अशा अनेक वैशिष्ट्यांनी चांदोरी लख लख तेजाची दुनिया वाटते.